Sudesh
ऑनलाईन जेवण मागवणं हल्ली खूपच सोपं झालं आहे. मात्र, त्यामुळेच आपण स्वयंपाकघरापासून दूर जात आहोत. घरी केलेल्या स्वयंपाकच का बेस्ट असतो, याची काही कारणं..
घरी एखादा पदार्थ बनवताना त्यातील पदार्थांची क्वालिटी आपण स्वतः निवडू शकतो. यामुळे सकस आणि चौरस आहार आपण बनवू शकतो.
बाहेरुन मागवताना हाफ-फुल असे दोनच पर्याय असतात. त्यामुळे कधी भूक असूनही पोट भरत नाही, तर कधी प्रमाणापेक्षा जास्त खावं लागतं. घरी आपल्याला जेवढं हवं तेवढं बनवून खाऊ शकतो.
घरी अन्न बनवताना त्यात कोणते पदार्थ टाकायचे, कोणते नाही टाकायचे याचा निर्णय पूर्णपणे आपल्या हातात असतो.
घरी बनवलेलं अन्न आपण स्वतः बनवलेलं असल्यामुळे ते ताजं असल्याची खात्री असते. मागवलेलं अन्न फ्रेश बनवलं आहे, की फक्त गरम करुन दिलंय हे सांगता येत नाही.
बाहेर जेवल्यामुळे किंवा वारंवार ऑनलाईन ऑर्डर केल्यामुळे भरपूर खर्च होतो. मात्र, घरी अन्न बनवल्यास खर्चावर देखील नियंत्रण राहतं.
घरी जेवण बनवताना त्यात कुटुंबातील इतर व्यक्तीही मदत करू शकतात. यामुळे कुटुंबातील बंध आणखी घट्ट होण्यास मदत होते.