Monika Lonkar –Kumbhar
चेहऱ्यावर सुंदर ग्लो यावा यासाठी आपण नानाप्रकारचे उपाय करतो.
फेसपॅक, फेस स्क्रबसोबतच विविध प्रकारच्या ब्युटी ट्रीटमेंट्स देखील करण्यावर महिलांचा भर असतो. परंतु, तुम्हाला आईस फेशिअलबद्ल माहित आहे का?
चेहरा काही सेकंदांसाठी बर्फात बुडवून ठेवण्याला आईस फेशियल म्हणतात. एका मोठ्या भांड्यात पाण्यात बर्फ टाका आणि त्यात तुमचा चेहरा बुडवा आणि 20-30 सेकंदांनंतर चेहरा बाहेर काढा. तुम्हाला असे करायचे नसेल तर सूती कापडात बर्फ घेऊन तो तुम्ही चेहऱ्यावर फिरवू शकता.
उन्हाळ्यात खास करून आईस फेशिअल करण्यावर भर दिला जातो. आईस फेशिअल केल्याने डोळ्यांची सूज कमी होते.
आईस फेशिअल केल्याने चेहऱ्याचे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. यामुळे, चेहऱ्यावर सुंदर ग्लो येतो.
आईस फेशिअल केल्याने सनबर्नपासून आराम मिळू शकतो.
चेहऱ्यावरील अतिरिक्त तेलाची समस्या कमी करण्यासाठी तुम्ही आईस फेशिअलची मदत घेऊ शकता.