Monika Lonkar –Kumbhar
गवतीचहा हा आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानला जातो.
अनेकांना गवतीचहा घातलेला चहा प्यायला आवडतो. आपल्या सर्वांच्या जीवनशैलीचा हा एक महत्वाचा भाग झाला आहे.
केवळ चहापुरताच गवतीचहा महत्वाचा नाही तर तो अनेक समस्यांसाठी प्रभावी आहे. गवतीचहाचे इतर फायदे जाणून घेऊयात.
गवतीचहाचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
गवतीचहामध्ये जे गुणधर्म आहेत, ते चिंता आणि नैराश्याच्या लक्षणांपासून मुक्त होण्यास मदत करतात.
गवतीचहामधील पोषकतत्वे आपल्या शरीराची पचनक्षमता सुधारण्यास मदत करतात.
गवतीचहा शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करू शकते, ज्यामुळे हृदयरोग आणि इतर संबंधित आजार होतात.