Sudesh
कायम खाते क्रमांक, म्हणजेच पॅनकार्ड हा एक महत्त्वाचा दस्तावेज आहे. अनेक सरकारी योजनांचा लाभ यामुळे घेता येतो.
तुम्ही आपल्या लहान मुलांच्या नावाचे पॅन कार्ड देखील काढू शकता. याचे अनेक फायदे आहेत.
मुलांच्या नावावर गुंतवणूक करताना या पॅनकार्डचा फायदा होतो. काही योजनांमध्ये हे अनिवार्य असते.
एखाद्या गुंतवणुकीसाठी मुलांना नॉमिनी करताना याचा फायदा होतो.
हा मुलांच्या ओळखीचा दस्तावेज होतो. बँक खातं किंवा पासपोर्ट काढताना याचा उपयोग होतो.
अल्पवयीन मुलांच्या पॅनकार्डासाठी आई-वडिलांनी अर्ज करावा लागतो. यासाठी NSDL च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
यासाठी आई-वडिलांच्या ओळखीचा पुरावा, मुलांचे आधार कार्ड, घराच्या पत्त्यासाठी वीजबिल किंवा रेशन कार्ड, मुलाच्या वयाचे प्रमाणपत्र तसंच मुलाचा आणि पालकांचा फोटो अशी कागदपत्रे आवश्यक आहेत.
अर्ज प्रक्रिया पूर्ण करुन 15 दिवसांनंतर तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर पॅनकार्ड घरपोच मिळते.