Monika Lonkar –Kumbhar
त्वचेच्या समस्या दूर व्हाव्यात, यासाठी आपण नाना प्रकारचे उपाय करत असतो. काही जण घरगुती उपाय करतात तर काही जण स्किनकेअर प्रॉडक्ट्सची मदत घेतात.
मात्र, या सर्व गोष्टी केल्यानंतर काहींना तात्पुरता फरक पडतो. शिवाय, जशी चमक चेहऱ्यावर हवी असते तशी चमक देखील मिळत नाही. त्यामुळे, चेहऱ्यावर ही चमक आणण्यासाठी तुम्ही जायफळची मदत घेऊ शकता.
जायफळमध्ये पोषकतत्वांचे विपुल प्रमाण आढळून येते. औषधी घटकांनी परिपूर्ण असलेले हे जायफळ आपल्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे.
जायफळ उगाळून चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावर छान चमक येते. यासोबतच, त्वचेतील मृत पेशी काढून टाकण्यास जायफळ मदत करते.
जायफळ हे एक प्रकारचे नैसर्गिक एक्सफोलिएंट आहे. त्यामुळे, जायफळ त्वचेवर लावल्याने आपली त्वचा स्वच्छ राहते. जायफळ हे संवेदनशील त्वचेच्या लोकांसाठी देखील फायदेशीर आहे.
जायफळ उगाळल्यानंतर त्यात गुलाबजल मिसळा. आता हे मिश्रण चेहऱ्यावर आणि डोळ्यांखाली लावा. हा उपाय केल्याने डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांची समस्या दूर होण्यास मदत होते.
जायफळ चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्याचे आतून चांगल्या प्रकारे मॉईश्चरायझेशन होते आणि चेहरा चमकदार दिसू लागतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.