आरोग्यासाठी फायदेशीर असणाऱ्या ‘या’ डाळींमध्ये लपलाय प्रथिनांचा खजिना

Monika Lonkar –Kumbhar

डाळी

भारतीय जेवणात प्रामुख्याने डाळींचा समावेश केला जातो.

जेवण

बरेच लोक दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणात डाळींचे सेवन करतात. 

विविध प्रकारच्या डाळी

डाळींमध्ये मूग डाळ, तूर डाळ, हरभरा डाळ, मसूर डाळ इत्यादी अनेक प्रकारच्या डाळींचा समावेश होतो. 

मसूर डाळ

अशक्तपणा दूर करण्यासाठी शारिरीक तंदूरूस्तीसाठी मसूर डाळ अतिशय उत्तम मानली जाते.

उडीद डाळ

उडदाच्या डाळीमध्ये प्रथिनांसोबतच, जीवनसत्वांचे भरपूर प्रमाण आढळून येते. उच्च प्रथिनांचा स्त्रोत म्हणून या डाळीकडे पाहिले जाते.

मूग डाळ

मूग डाळ देखील प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. ही डाळ खाल्ल्याने आपल्या शरीराला आवश्यक प्रथिने मिळू शकतात.

तूर डाळ

तूर डाळीमध्ये प्रथिनांसोबतच फायबर्सचे भरपूर प्रमाण आढळते, त्यामुळे, ही डाळ आरोग्यासाठी लाभदायी मानली जाते. 

उन्हाळ्यात नाचणीचे सेवन करणे, आरोग्यासाठी लाभदायी, जाणून घ्या फायदे

Benefits of finger Millet | esakal
येथे क्लिक करा.