Saisimran Ghashi
वास्तूच्या अनुसार घराचे मुख्यद्वार हे महत्त्वपूर्ण स्थान असते अशात त्या ठिकाणी काही धार्मिक चिन्ह बनवणे अत्यंत शुभ मानले जातात.
काही लोक दरवाजावर ॐ हे चिन्ह बनवतात हे चिन्ह घरी सुख शांती आणि समृद्धी घेऊन येते तर जाणून घेऊया मुख्य दरवाजावर ॐ किंवा अन्य धार्मिक चिन्ह बनवणे किती फायदेशीर आहे.
मुख्य दरवाजावर ॐ किंवा अन्य धार्मिक चिन्ह बनवणे फायदेशीर आहे. वास्तूच्या अनुसार घराचा मुख्य दरवाजा त्या घरात ऊर्जा कायम ठेवतो असे मानले जाते की त्यावर बनवलेले शुभ चिन्ह घरात सकारात्मक ऊर्जा घेऊन येतात.
ओमचे महत्व हिंदू धर्मामध्ये ओम या शब्दाचा उच्चार केल्याने शरीरात ऊर्जा प्राप्त होते तसेच या चिन्हाला खूप पवित्र आणि शुभ मानले जाते घराच्या मुख्य दरवाज्यावर हळद आणि कुंकू च्या मदतीने तुम्ही ओम चिन्ह बनवू शकता
याच्यामुळे घरातील लोक फार कमी आजारी पडतात आणि शांतता राहते. घरात राहते सुख शांती मानले जाते की ओम चिन्ह घरात सुख शांती घेऊन येते आणि हे वाईट शक्तीला घरात आतमध्ये येण्यापासून रोखते.
घराच्या बाहेर ॐ चिन्ह लावल्याने घराच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी हे शुभ मानले जाते याच्यामुळे मनाला शांती मिळते.
घराच्या बाहेर शुभचिन्ह लावल्याने याचा आर्थिक फायदा देखील होतो असे म्हटले जाते की याच्यामुळे घरातील दारिद्र्य कमी होते आणि त्या घरात लक्ष्मीचा वास कायम राहतो.
घराच्या बाहेर ॐ चिन्ह लावल्याने घरातील वास्तुदोष दूर होण्यास मदत होते आणि घरातील भांडण तंटे कमी होतात.
मुख्य दरवाजावर ॐ चे चिन्ह बनवण्याचे लाभ मान्यतांच्या आधारावर बनवले गेले आहेत.