Monika Lonkar –Kumbhar
चंदन आपल्या त्वचेसाठी अतिशय गुणकारी मानले जाते.
चंदनाचे लाकूड हे जगातील सर्वात महागड्या लाकडांपैकी एक आहे. याचा उपयोग धार्मिक कार्यासाठी आणि त्वचेसाठी केला जातो.
चंदनामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आढळतात, ज्यामुळे त्वचेला अनेक फायदे होतात.
चंदनाचा वापर त्वचेवर केल्याने त्वचा उजळण्यास मदत होते.
चंदन किंवा चंदनाचा वापर केलेला फेसपॅक चेहऱ्यावर लावल्याने पिंपल्सपासून सुटका होऊ शकते.
टॅन झालेली त्वचा चंदनाच्या वापरामुळे पुन्हा सामान्य होते आणि त्वचेवर सुंदर ग्लो येतो.
चंदनाच्या वापरामुळे त्वचा चमकदार आणि मुलायम होते.