Sudesh
आपल्याकडे कित्येक लोक श्रावण महिन्यात मांसाहार करणे टाळतात. कित्येक लोकांच्या घरामध्येही नॉनव्हेज शिजत नाही.
शाकाहार करण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळेच जगभरातील कित्येक लोक कायमस्वरूपी मांसाहार बंद करत आहेत.
एक महिना मांसाहार टाळल्यामुळे तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो, याबाबत संशोधनातून माहिती समोर आली आहे. डाएटिशियन डॉ. एकता सिंहवाल यांनी याबाबत माहिती दिली आहे.
एकता यांनी सांगितलं, की शाकाहारी खाण्यामध्ये फायबरचा समावेश मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे पचनसंस्था सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
हिरव्या पालेभाज्यांमध्ये नॉनव्हेजच्या तुलनेत कमी कॅलरी आणि अधिक फायबर असतात. त्यामुळे, पुन्हा-पुन्हा भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात राहतं.
प्रोसेस केलेलं मांस खाल्ल्यामुळे कित्येक जणांना शरीरात सूज येण्यासारख्या समस्या उद्भवतात. एक महिना मांसाहार टाळल्यास यातून आराम मिळतो. तसंच, सिस्टिमॅटिक इन्फ्लेमेशन देखील कमी होतं.
मांसाहारामध्ये सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅटचे प्रमाण अधिक असते. यामुळे कोलेस्ट्रॉल वाढते. मांसाहार कमी केल्यास कोलेस्ट्रॉलचा स्तर नियंत्रणात राहतो. यामुळे हृदयरोग होण्याचा धोका कमी होतो.
फळं, भाज्या, ड्रायफ्रुट्स आणि बियांचे सेवन अधिक प्रमाणात केल्यामुळे तुमच्या शरीरातील अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण वाढते. यामुळे एकूणच तब्येतीवर चांगला परिणाम दिसून येतो.
प्लांट-बेस्ड आहारातून व्हिटॅमिन, खनिज आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट मिळतात. यामुळे दिवसभर तुमची एनर्जी टिकून राहते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.