Monika Lonkar –Kumbhar
'व्हिटॅमिन ई' हे जीवनसत्व आपल्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी अतिशय फायदेशीर मानले जाते.
'व्हिटॅमिन ई' त्वचा आणि केसांची चमक टिकवून ठेवण्यास मदत करते. आज आपण व्हिटॅमिन ई चेहऱ्याला लावण्याचे फायदे काय आहेत? ते जाणून घेऊयात.
'व्हिटॅमिन ई' मध्ये आढळून येणारी पोषकतत्वे त्वचा, केस अन् आरोग्यासोबतच डोळ्यांसाठी लाभदायी मानली जातात.
व्हिटॅमिन ई हे अँटिऑक्सिडंटचे पॉवरहाऊस आहे. ज्यामुळे, ते सूर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेचा बचाव करते आणि सनबर्न रोखते.
त्वचेवर 'व्हिटॅमिन ई' चा वापर केल्याने त्वचा हायड्रेटेड राहण्यास मदत होते.
व्हिटॅमिन ई हे त्वचेसाठी क्लिंझिंग एजंट म्हणून काम करते. जे त्वचेती धूळ, अतिरिक्त तेल काढून टाकते.
'व्हिटॅमिन ई' चे मॉईश्चरायझिंग गुणधर्म त्वचेला तरुण ठेवण्यास आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात.