Sudesh
तुम्हाला कमी किंमतीत बेस्ट कॅमेरा क्वालिटी असलेला फोन हवा असेल, तर त्यासाठी सध्या कित्येक पर्याय उपलब्ध आहेत. केवळ कॅमेराच नाही, तर इतर फीचर्सच्या बाबतीत देखील हे फोन उत्तम आहेत.
या फोनमध्ये मागच्या बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. यातील प्रायमरी कॅमेरा ६४ मेगापिक्सलचा आहे. यासोबत २-२ मेगापिक्सलचे डेप्थ आणि मायक्रो कॅमेरे मिळतात. याचा फ्रंट कॅमेरा १६ मेगापिक्सलचा आहे.
यासोबतच वनप्लसच्या या फोनमध्ये ६ जीबी रॅम+ १२८ जीबी स्टोरेज आणि ५००० mAh बॅटरी मिळते. या फोनची किंमत १८,९९० रुपये आहे.
या फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळतो. यात पोट्रेट, पॅनोरमा, नाईट मोड, प्रो मोड, एआय डिटेक्शन असे बरेच फीचर्स मिळतात.
तगड्या कॅमेऱ्यासह रेडमीच्या या फोनमध्ये ५००० mAh क्षमतेची दमदार बॅटरी मिळते. या फोनची किंमत १६,९९९ रुपये आहे.
हा खरंतर एक गेमिंग स्मार्टफोन आहे. मात्र, यासोबतच याचा कॅमेराही तेवढाच चांगला आहे. यात ड्युअल कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे, ज्यामधील मुख्य कॅमेरा ५० मेगापिक्सलचा आहे.
iQOOच्या या फोनचा बेस व्हेरियंट ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजसह येतो. याची किंमत १५,९९९ रुपये आहे.
रेडमीच्या या फोनमध्ये मागच्या बाजूला क्वाड कॅमेरा सेटअप मिळतो. याचा प्रायमरी कॅमेरा तब्बल १०८ मेगापिक्सलचा आहे. सेकंडरी ८ मेगापिक्सल कॅमेऱ्यासह २-२ मेगापिक्सलचे इतर सेन्सर दिले आहेत.
हा फोन ६ जीबी रॅम + ६४ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज अशा दोन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. बेस व्हेरियंटची किंमत १६,४९९ रुपये आहे.
वनप्लसच्या या फोनमध्ये देखील १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. यासोबतच २-२ मेगापिक्सलचे आणखी दोन कॅमेरे यात दिले आहेत.
या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६९५ हा ५जी चिपसेट देण्यात आला आहे. याची सुरूवातीची किंमत १९,९९९ रुपये आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.