Monika Lonkar –Kumbhar
साडी हा महिलांचा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि प्रेमाचा विषय आहे.
कार्यक्रम कोणताही असो महिला नेहमी साडी परिधान करण्याला प्राधान्य देतात.
साडीमध्ये आपला संपूर्ण लूक सुंदर दिसावा यासाठी मेकअपसोबतच हेअरस्टाईल देखील तितकीच महत्वाची आहे. आज आपण अशाच हटके हेअरस्टाईल्सबद्दल जाणून घेणार आहोत.
केसांच्या मागील बाजूस ही हेअरस्टाईल केली जाते आणि नंतर फिशटेल किंवा फ्रेंच वेणीमध्ये केस बांधले जाते.
मॉर्डन पद्धतीच्या साड्यांवर किंवा पार्टीवेअर साडीवर या प्रकारची हेअरस्टाईल खुलून दिसते.
ही एक मिक्स हेअरस्टाईल आहे, ज्यामध्ये अर्धे केस वरती बांधले जातात आणि अर्धे केस मोकळे सोडले जातात. साडीवर ही हेअरस्टाईल फारच सुंदर दिसते.
हाय पोनीटेल ही हेअरस्टाईल साडीवर खूपच उठून दिसते.