Aishwarya Musale
नवरात्र मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरी केला जाते. त्याची तयारी मोठ्या उत्साहात सुरू आहे. हा सण देशाच्या वेगवेगळ्या भागात साजरा केला जातो
सर्वात मोठा गरबा आणि दांडिया नाईट गुजरात आणि मुंबईत होतात. लोक दोन दांडिया घेऊन आणि मोठ्या उत्साहात घराबाहेर पडतात. आम्ही नवरात्रीत गरब्यासाठी काही प्रसिद्ध ठिकाणांबद्दल सांगणार आहोत.
तुम्हाला जर खरोखरच जुन्या पद्धतीने गरब्याचा आनंद घ्यायचा असेल तर वडोदरा येथे जा. लोकगीतांच्या लाइव्ह गायकांसह येथे गरबा सादर केला जातो. जेथे मोठे गायक देखील लाइव्ह परफॉर्म करतात.
मुंबईत नवरात्रीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मुंबईत अनेक ठिकाणे आहेत जिथे तुम्ही दांडियाचा आनंद घेऊ शकता. अनेक ठिकाणी बॉलिवुड अभिनेता, अभिनेत्री देखील उपस्थित असतात.
येथे होणारी लाल रास गरबा नाईट खूप प्रसिद्ध आहे. नवरात्रीच्या उत्सवात सर्व नवे कलाकार दररोज येथे सादरीकरण करतात
दिल्लीत अनेक ठिकाणी गरबा नाईटचे आयोजन केले जाते. अशी काही ठिकाणे आहेत जिथे गरबा संध्याकाळी सुरू होतो आणि रात्री १०.३० ला संपतो.
नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी सुरतच्या लोकांमध्ये एक वेगळाच उत्साह असतो. येथे अनेक मोठे कार्यक्रम आयोजित केले जातात, ज्यात सुरतचे अनेक लोक सहभागी होतात.
इंदूर आपल्या चाट आणि गरबा नाईटसाठी खूप प्रसिद्ध आहे. येथे गरबा आणि दांडियाचा सराव काही महिने आधीच सुरू होतो. तसेच नवरात्रीमध्ये गरबा नाईटमध्ये लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या भेटवस्तू देखील मिळतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.