आज पासूनच खायला सुरु करा, हे ३ गोष्टी, कधीच होणार नाही व्हिटामिन बी १२ ची कमी

सकाळ डिजिटल टीम

व्हिटामिन बी१२ हे अत्यंत गरजेचे पोषकतत्व आहे. जे शरीराच्या विवइध कार्यांमध्ये महत्त्वाची भूमिका निभावतात. लाल रक्तपेशींचे उत्पादन, हेल्दी नर्व्हस सिस्टीम आणि डीएनएच्या कामांसाठी गरजेचे आहे.

व्हिटामिन बी१२ उपाय

आपले शरीर स्वत:हून बी १२ ची निर्मिती करत नाही. यासाठी आपल्या आहारातून बी१२चा शरीराला पुरवठा करणे गरजेचे असते.

व्हिटामिन बी१२ची मात्र ३००Pg/ml पेक्षा जास्त असणे नॉर्मल मानले जाते. जेव्हा २०० Pg/ml पेक्षा कमी हा स्तर सातत्याने की होतो तेव्हा व्हिटामिन बी १२ची कमतरता मानली जाते.

व्हिटामिन बी १२ची सतत कमी होत असल्यास त्याला व्हिटामिन बी १२ हे नावानी ओळखले जाते. जर वेळेवर याकडे लक्ष दिले नाही तर गंभीर समस्या निर्माण होऊ शकते.

व्हिटामिन बी१२च्या कमतरतेमुळे हात-पाय सुन्न होतात. तसेच चेहरा पिवळा पडणे, स्किन ड्राय होणे तसेच स्मरणशक्ती कमी होणे, स्वभाव चिडचिडा होणे यासारखी लक्षणे दिसतात.

कोणत्याही व्यक्तीच्या शरीरात बी१२ ची कमतरता निर्माण होऊ शकते. मात्र शाकाहारी लोकांच्या शरीरात बी१२ची कमतरता अधिक आढळते.

आज अशा ३ गोष्टी सांगणार आहोत. ज्यामुळे शाहाकारी लोकांच्या शरीरात बी१२ची कमतरता भासणार नाही.

न्यूट्रिशनल यीस्ट एक विगन पदार्थ आहे. ज्यात व्हिटामिन बी १२, बी ६ आणि बी १ मुख्य घटक असतो. याचा वापर वेगवेगळ्या पदार्थामध्ये करता येते. जस कि सूप सलाड, व पॉपकॉर्न वर स्प्रेड करून आपल्या दररोजच्या डाएटमध्ये सामील करून व्हिटामिन बी१२ची कमतरता भरून काढू शकता.

बी१२ची कमतरता भरून काढण्यासाठी डेअरी पदार्थ जसे दूध, दही आणि पनीर हा व्हिटामिन बी१२चा चांगला स्त्रोत आहे.

सीवीड मध्ये विटामिन बी१२ असते. जपानी आणि कोरियन खाण्यामध्ये सीवीड्सचा समावेश अधिक केला जातो.

येथे क्लिक करा....

ब्लाउज आणि ड्रेसला लावा रंगीबेरंगी लटकन, पाहा हटके डिझाइन्स