Anuradha Vipat
अभिनेत्री भाग्यश्रीने सूरज बडजात्याच्या 'मैने प्यार किया' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट प्रचंड हिट ठरला.
या चित्रपटातून सलमान आणि भाग्यश्री दोघांनाही बरीच ओळख मिळाली. या चित्रपटाच्या शूटिंगनंतर भाग्यश्रीने लग्न केले.
हिमालय दासानीसोबत ती रिलेशनशिपमध्ये होती आणि या चित्रपटातून स्टार झाल्यानंतर तिने लग्न केले.
भाग्यश्रीने नुकत्याच झालेल्या संवादात 'मैने प्यार किया'चे दिवस आठवले. संवादादरम्यान, तिने चित्रपटाच्या पोस्टरच्या शूटिंगच्या दिवसांची आठवण करून देणारा एक किस्सा शेअर केला.
भाग्यश्रीने सांगितले की, ती त्यावेळी गरोदर होती, पण कोणालाच याची माहिती नव्हती. त्यामुळे ती पोस्टरच्या शूटिंगसाठी गेली तेव्हा सलमानने तिला सांगितले की ती लठ्ठ झाली आहे.
अभिनेत्रीने सांगितले की, 'मैने प्यार कियाच्या पोस्टरसाठी प्रसिद्ध फोटोग्राफर गौतम राजदक्ष्यसोबत फोटोशूट केले तेव्हा मी पाच महिन्यांची गरोदर होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.