Anuradha Vipat
भारती सिंह हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे.
भारती सिंहची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.
नुकताच भारती सिंहने एक मोठा खुलासा केला आहे ज्याची आता जोरदार चर्चा होताना दिसत आहे
भारती सिंहने ट्रोलर्सला खडेबोल सुनावले आहेत. भारती सिंह म्हणाली की, लोक माझ्याबद्दल काय विचार करतात आणि मला काय बोलतात याचा मला काहीच फरक पडत नाही.
पुढे भारती सिंह म्हणाली, जे आपल्या स्वत: च्या आयुष्यात काहीच करू शकत नाहीत ते चुकीच्या गोष्टी बोलतात.
मी एखादा सुंदर आणि चांगला फोटो शेअर केला की, काही लोक पांडा, गेंडी, आज पांडा क्यूट दिसत आहे, अशाप्रकारच्या कमेंट करतात असंही भारती सिंह म्हणाली
मी खरे सांगते की, अशा लोकांचा आणि त्यांच्या कमेंटचा फरक मला अजिबात पडत नाही. हेच नाही तर मी त्यांच्या कमेंटचा विचारही करत नाही असंही भारती सिंह म्हणाली