सकाळ डिजिटल टीम
अभिनेता आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर भुवन बाम त्याच्या कॉमिक सेन्समुळे सगळ्यांचाच लाडका आहे. मध्यंतरी त्याच्या काही वेबसिरीजही रिलीज झाल्या.
त्याची पहिली फिल्म ढिंढोरा प्रदर्शित होण्यापूर्वी भुवनने कोरोनामुळे त्याचे आई-वडील गमावले. याचा जबरदस्त धक्का त्याला बसला.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो याबद्दल व्यक्त झाला. जेव्हा त्याला आई-वडिलांबद्दल प्रश्न विचारला तेव्हा तो काही वेळ बोलूच शकला नाही. त्याच्या डोळ्यात पाणी आलं.
नंतर तो म्हणाला कि,"या घटनेतून अजून मी सावरू शकलो नाहीये. मी कुणाशीच याबद्दल बोललो नाहीये आणि मला माझ्या भावना व्यक्त करायच्या नाहीयेत. जे आहे ते चांगलं आहे असं मला वाटतंय. "
"मी जर त्या बद्दल बोलायला लागलो तर मग यात कुणाची चूक होती ? काय चुकीचं झालं ? असे सगळे आरोप-प्रत्यारोप होतील. त्यापेक्षा मला यात पडायचं नाहीये. माझ्या जवळच्या व्यक्ती माझ्याशी बोलायला तयार आहेत पण मला याबाबत बोलायचं नाहीये."
भुवन बाम हा महाराष्ट्रीयन असून त्याचं बालपण आणि शिक्षण दिल्लीमध्ये झालं आहे. तो उत्तम मराठी बोलतो.