Pranali Kodre
आयपीएल 2024 मध्ये 5 एप्रिलला 17 वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात झाला.
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने 6 विकेट्सने विजय मिळवला.
याच सामन्यात सनरायझर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या भुवनेश्वर कुमारने रचिन रविंद्रला बाद केले.
ही भुवनेश्वर कुमारची आयपीएलमधील 171 वी विकेट ठरली.
त्यामुळे भुवनेश्वर कुमारने लसिथ मलिंगाच्या आयपीएलमधील 170 विकेट्सच्या विक्रमाला मागे टाकले आहे.
भुवनेश्वर आता 5 एप्रिलपर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आला आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम 5 एप्रिलपर्यंत युजवेंद्र चहलच्या नावावर आहे. त्याने 193 विकेट्स घेतल्या आहेत.
त्याच्यापाठोपाठ या विक्रमाच्या यादीत ड्वेन ब्रावो (183), पियूष चावला (181), अमित मिश्रा (173) आणि आर अश्विन (172) आहेत.