Anuradha Vipat
बॉलिवूड अभिनेता गोविंदाबाबत मोठी बातमी समोर आली आहे
एका निवडणूक रॅलीदरम्यान गोविंदाची तब्येत अचानक बिघडली त्यानंतर त्याला मुंबईत आणण्यात आले आहे.
गोविंदाच्या तब्येतीशी संबंधित अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही
काही दिवसांपूर्वी गोविंदाच्या पायाला चुकून गोळी लागली होती.
माहितीनुसार, गोविंदा जळगावच्या पाचोरा येथे सभा घेत असताना अचानक त्यांची तब्येत बिघडली.
विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी तो जळगाव जिल्ह्यात गेला होता.
गोविंदाने भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाच्या युतीला मतदान करून पंतप्रधान मोदींना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे