Bigg Boss Marathi: अभिजीत सावंतबद्दल माहित नसलेल्या ५ गोष्टी जाणून घ्या

Pranali Kodre

अभिजीत सावंत

गायक अभिजीत सावंत सध्या बिग बॉस मराठीच्या ५ व्या सिजनचा स्पर्धक आहे.

Abhijeet Sawant | Instagram

प्रसिद्धी

अभिजीतला प्रसिद्धी २००५ साली आलेल्या इंडियन आयडॉल या रिऍलिटी शोमधून मिळाली. तो या शोच्या पहिल्या सिजनचा विजेता आहे.

Abhijeet Sawant | Instagram

मोहब्बते लुटाऊंगा...

अभिजीतने २००५ साली गायलेलं मोहब्बते लुटाऊंगा हे गाणं खूप प्रसिद्ध झालं होतं. त्याचा आपका अभिजीत, जुनून असे अल्बमलाही मोठी प्रसिद्धी मिळाली.

Abhijeet Sawant | Instagram

रिऍलिटी शो

अभिजीतने २००८ साली जो जिता वही सिकंदर या रिऍलिटी शोचेही उपविजेतेपद मिळवले होते. २००९ साली नच बलियेच्या चौथ्या सिजनमध्ये पत्नी शिल्पासह सहभाग घेतला होता.

Abhijeet Sawant With Wife Shilpa | Instagram

संसार

अभिजीतने २००७ साली शिल्पा यांच्याबरोबर लग्न केले. त्यांना आता दोन मुली आहेत. शिल्पा यांचा बेकिंगचा व्यायसायही आहे.

Abhijeet Sawant Family | Instagram

आदर्श

अभिजीत मोहम्मद रफी, किशोर कुमार, उदित नारायण आणि सोनू निगम यांचा खूप आदर करतो.

Abhijeet Sawant | Instagram

फॅन

रिपोर्ट्सनुसार अभिजीत शाहरुख खान आणि राणी मुखर्जी यांचा फॅन आहे. तसेच त्याला लहानपणी टॉम अँड जेरी आणि पोपोय हे कार्टुनही पाहायला आवडायचे.

Abhijeet Sawant | Instagram

क्रिकेट

अभिजीतला क्रिकेट पाहायलाही आवडते. सचिन तेंडुलकर त्याचा आवडता खेळाडू आहे.

Abhijeet Sawant | Instagram

अभिनय

अभिजीतने लॉटरी, तीस मार खान अशा चित्रपटांमध्ये, तर सीआयडी या शोमध्ये अभिनयही केला आहे.

Abhijeet Sawant | Instagram

वाद

अभिजीत २०१० मध्ये हिट अँड रन प्रकरणात अडकला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार त्याची मैत्री आणि इंडियन आयडॉलमधील स्पर्धक प्राजक्ता सुक्रे ही कार चालवत होती, तर अभिजीत बाजूला बसला होता. त्यावेळी त्यांच्या कारची धडक एका दुचाकीला लागली होती, ज्यात दोन युवक जखमी झाले होते.

Abhijeet Sawant | Instagram

राजकीय क्षेत्र

अभिजीतने राजकीय क्षेत्रही आजमावून पाहिले आहे. त्याने शिवसेना पक्षात प्रवेश केला होता.

Abhijeet Sawant | Instagram

सध्या काय करतो?

अभिजीत आता चित्रपटांमध्ये गाण्यासोबतच स्वत:ची गाणी लिहून ती गातोही. तसेच तो भारतात आणि परदेशात स्टेज शो देखील करत असतो.

Abhijeet Sawant | Instagram

Photo: बंध हे प्रेमाचे! भारतीय क्रिकेटपटूंचे बहिणीबरोबरचे गोड क्षण...

Indian cricketers with their sisters | Sakal
येथे क्लिक करा