सकाळ वृत्तसेवा
बिग बॉस मराठी सिजन ५ मध्ये निक्की तांबोळीही स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे.
निक्कीने आत्तापर्यंत अनेकदा तिच्या बिग बॉसच्या घरातील वक्तव्यांमुळे चर्चेत राहिली आहेत.
नक्की आणि वर्षा उसगांवकर यांच्यातही खडाजंगी उडाल्याचे दिसले होते.
पण, जिओ सिनेमा ऍपवर असलेल्या बिग बॉसच्या अनसीन अनदेखामधील एका क्लिपमध्ये चक्क निक्कीने वर्षा उसगांवकर यांना तिला कसा पार्टनर हवाय याबाबत खुलासा केला आहे.
वर्षा यांनी निक्कीला याबाबत विचारल्यानंतर निक्कीनं सांगितलं की मला बिझनेस करायला आवडतो. मला एक मराठी चित्रपटाची निर्मितीही करायची आहे. मला ब्रँडही चालू करायचे आहे, हे माझं स्वप्न आहे.
निक्की पुढे म्हणाली, 'मला पार्टनरबद्दल विचाराल, तर मला बॉयफ्रेंड होते, पण सध्या मी सिंगल आहे. एक चांगला मुलगा मिळणं कठीण आहे. त्याने थोडं स्वातंत्र्य दिलं पाहिजे. तो माझ्यापेक्षा लहान असो किंवा मोठा असला तरी चालेल, पण मला अल्फा मेन पाहिजे.'
निक्कीनं पुढे सांगितलं की 'मला जो मुलगा हवाय, त्यात स्त्रीदाक्षिण्य हवं. माझ्यासाठी हे खूपच महत्त्वाचं आहे. मी खूप गोष्टींच निरिक्षण करत असते, त्यामुळे ज्यांच्यात मला हव्या त्या क्वालिटी दिसत नाही, त्यांना मी नाकारते.'