संग्राम चौगुलेचा कसा आहे डाएट? Bigg Boss ला फुटणार घाम

Pranali Kodre

संग्राम चौगुले

भारताचा प्रसिद्ध बॉडी बिल्डर संग्राम चौगुलेने बिग बॉस मराठी सिजन ५ मध्ये वाईल्ड कार्ड प्रवेश केला आहे.

Sangram Chougule | Instagram

बॉडी बिल्डींग

मुळचा कोल्हापूरचा असलेला संग्राम चौगुले गेल्या अनेक वर्षांपासून बॉडी बिल्डींग क्षेत्रात असून त्याने मिस्टर इंडिया, मिस्टर युनिवर्स असे मोठे किताबही जिंकले आहेत.

Sangram Chougule | Instagram

डाएट

दरम्यान, संग्राम हा बॉडी बिल्डर असल्याने त्याचा डाएटही जवळपास ठरलेला आहे.

Sangram Chougule | Instagram

राशन खरेदी

मात्र, यंदाच्या बिग बॉसमध्ये असं बऱ्याचदा दिसलंय की स्पर्धकांना जेवणासाठीचे राशनही खरेदी करावे लागत आहे, त्यामुळे त्यांना त्यांच्या आवडीचे पदार्थही कधी कधी मिळत नाहीत.

bigg boss marathi | Sakal

फुटणार घाम?

अशात आता संग्राम चौगुले त्याचा डाएट कसा करणार आणि त्यामुळे बिग बॉसला घाम फुटणार का? हे पाहावं लागणार आहे.

Sangram Chougule | Instagram

नाश्ता

संग्रामच्या डाएटबद्दल सांगायचे झाले, तर मसलब्लेझच्या २०२३ मधील रिपोर्ट्सनुसार नाश्ता म्हणून तो साधारण ४ औंस (१ औंस म्हणजे जवळपास २८.३६ ग्रॅम) ओट्स, २ अंडे, २ ब्रेड आणि ६ औंस चिकन खातो.

Sangram Chougule | Instagram

दुपारचं जेवण

तो दुपारच्या जेवणात लीन प्रोटीन आणि कॉम्प्लेक्स कार्ब्स असणारे पदार्थ, चांगले फॅट्स असणारे पदार्थ, भात, हिरव्या पालेभाज्या, चिकन खातो.

Sangram Chougule | Instagram

रात्रीचं जेवण

त्यानंतर तो रात्रीच्या जेवणातही मांसाहार, भाज्या आणि भात खातो. तसेच शेवटी प्रोटीन शेक घेतो.

Sangram Chougule | Instagram

शुभमन गिलला 'काका' का म्हणतात?

Shubman Gill | Sakal
येथे क्लिक करा