Swadesh Ghanekar
मराठी बिग बॉसच्या घरात सूरज चव्हाणला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे
सूरजचा साधेपणा हा मराठी घरातील प्रत्येकाला आवडतोय.
बिग बॉस मराठी’च्या घरात आलेल्या सदस्यांनी चार ते पाच बॅग भरून सामान आणलं होतं
लोकांना मोठेपणा दाखवण्यासाठी सूरजने कुठलंही सोंग केलं नाही.
पण, गरीब घरातला सूरज हा बिग बॉसच्या घरात दोन टीशर्ट आणि तुटलेली चप्पल घालून आला होता
टिकटॉक स्टार सूरजने त्याच्या विनोदी अंगाच्या व्हिडीओने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.
बिग बॉसमधील सगळ्याच कंटेस्टंटला कॉस्टयूम डिझायनरकडून खास डिझाइन केलेले कपडे घालायला दिले जातात.
हे सगळे कपडे त्यांना परत रिटर्न करावे लागतात. पण सुरजच्या बाबतीत डिझायनरने खास निर्णय घेतल्याचे समजतेय
त्याच्या गरिबीची दखल घेऊन कॉस्टयूम डिझायनर यांनी त्याचे कपडे त्यालाच देऊ केले आहेत.