सकाळ डिजिटल टीम
जर तुम्हाला प्रवासाची आवड असेल आणि इतिहासात रस असेल, तर बिहारच्या 'या' 7 पर्यटन स्थळांना भेट देण्याची योजना नक्की करा.
भारतातील सर्वात जुने विद्यापीठ बिहारमध्ये आहे, जे नालंदा विद्यापीठ म्हणून ओळखले जाते. जर तुम्ही ऐतिहासिक ठिकाणाला भेट देण्यासाठी उत्सुक असाल, तर येथे जरूर भेट द्या.
बिहारची राजधानी पाटणा हे खूप मोठे शहर आहे. प्राचीन काळी पाटलीपुत्र या नावाने ओळखले जाणारे शहर आहे. शीख भाविकांसाठी हे तीर्थक्षेत्र आहे. कारण, शेवटचे शीख गुरू, गुरु गोविंद सिंग यांचा जन्म येथे झाला होता.
बिहारमधील गया हे पर्यटकांसाठी खूप चांगले ठिकाण आहे. येथील सर्वात प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक म्हणजे बोधगया. येथे एका पिंपळाच्या झाडाखाली बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली, असं म्हणतात.
बिहारमधील वैशाली हे देखील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. शेवटचे जैन तीर्थंकर भगवान महावीर यांचं जन्मस्थान म्हणून वैशालीला प्रसिद्धी मिळाली.
राजगीर हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. मध्य बिहारच्या धार्मिक स्थळांच्या यादीत त्याचा समावेश आहे. राजगीर हे त्याच्या नैसर्गिक सभोवतालच्या आणि बौद्ध, जैन आणि हिंदू धर्मातील आध्यात्मिक महत्त्वासाठी लोकप्रिय आहे.
बिहारमधील सासाराम भागातील शाह सूरी मकबऱ्याचे नाव तुम्ही ऐकले असेल. याला भारताचा दुसरा ताजमहाल असंही म्हणतात.