आशुतोष मसगौंडे
हिंदी दी चित्रपटसृष्टीत पूर्वीच्या काळी अनेक कलाकारांना त्यांचा आवाज व्यावसायिक व्हॉइसओव्हर आर्टिस्टकडून डब करून मिळत असे.
राणी मुखर्जी, बिपाशा बसू, अमिषा पटेल, कतरिना कैफ, दीपिका पदुकोण आणि नर्गिस फाखरी या लोकप्रिय अभिनेत्रींनीदेखील डबिंग कलाकारांचा वापर केला आहे.
या सर्वांसाठी सुप्रसिद्ध डबिंग कलाकार मोना घोष यांनी आपला आवाज दिला आहे.
आता नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत मोनाने तिच्या कामाबद्दल आणि अभिनेत्रींकडून मिळणाऱ्या वेगवेगळ्या प्रतिक्रियांबद्दल मोकळेपणाने बोलले.
मोनाने सांगितले की, "एकदा बिपाशा बसूने गमतीने तिला सांगितले होते की, जर तू माझ्यासाठी पुन्हा डब केले तर मी तुला मारून टाकीन."
एका यूट्युब चॅनलवर बोलताना मोनाने सांगितले की, तिने बिपाशासाठी राज, जिस्म, फूटपाथ आणि गुनाह या चित्रपटांमध्ये आवाज दिला आहे.
डबिंगनंतर मोनाला अभिनेत्रींच्या प्रतिक्रिया विचारण्यात आल्यावर मोनाने अनेक किस्से सांगितले