कडू कारल्यात लपलाय आरोग्याचा खजिना

Monika Lonkar –Kumbhar

कारले

चवीने कडू असणारे कारले खायला सगळ्यांनाच आवडते असे नाही.

आहार

कडू कारल्यापासून आपण विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवतो.

आरोग्य

हे कडू कारले आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्याचे आरोग्यदायी फायदे कोणते? जाणून घेऊयात.

रोगप्रतिकारक शक्ती

कारल्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर पोषकघटक असतात. त्यामुळे, कारल्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

मधुमेह

मधुमेहींसाठी कारल्याची भाजी उपयुक्त आहे. कारल्यामध्ये असणारे संयुग रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्याचे काम करतात.

वजन नियंत्रित राहते

कारल्यामध्ये कमी कॅलरीज आणि फायबर्स जास्त असतात. त्यामुळे, वजन कमी करण्यास मदत होते.

पचनक्षमता सुधारते

कारल्यामध्ये फायबर्सचे प्रमाण अधिक आढळून येते. त्यामुळे, पचनक्षमता सुधारण्यास मदत होते.

सायंकाळी वर्कआऊट करणे आरोग्यासाठी फायदेशीर

Benefits of Evening Workout | esakal
येथे क्लिक करा.