काळे की पांढरे? हिवाळ्यात कोणते तीळ आरोग्यासाठी जास्त फायदेशीर

Aishwarya Musale

हिवाळा

हिवाळ्यात तीळ खाणं फार फायदेशीर मानलं जातं. पण लोक बऱ्याचदा काळे की पांढे तीळ खावेत याबाबत कन्फ्यूज असतात.

आरोग्य

तसे तर दोन्हींमध्ये पोषक तत्व भरपूर असतात आणि यांच्या सेवनाने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. पण जास्त फायद्यांसाठी कोणते तीळ जास्त खावेत हे जाणून घेऊया. 

तीळ

दोन्ही तीळामध्ये भरपूर प्रमाणात पोषक असतात आणि त्यांच्या सेवनाने आरोग्यासाठी अनेक फायदे मिळतात, परंतु हिवाळ्यात तुम्ही काळ्या तिळाचे अधिक सेवन केले पाहिजे. कारण ते जास्त फायदेशीर आहे आणि त्यात पांढऱ्या तिळापेक्षाही जास्त पोषक असतात.

हाडांचे आरोग्य सुधारते

हिवाळ्यात जास्त पांढरे तीळ खाण्याऐवजी काळ्या तिळाचे लाडू आणि चिक्की खाल्ल्यास हाडांचे आरोग्य सुधारते. हिवाळ्यात इन्फेक्शन आणि इतर आजारांपासून बचाव करायचा असेल तर काळ्या तिळाचं अधिक सेवन करा.

रक्तदाब

जर तुमचा रक्तदाब हाय असेल तर तुम्ही काळ्या तिळाचे पदार्थ सेवन केले पाहिजे. 

निरोगी

काळ्या तीळामध्ये पांढऱ्या तिळापेक्षा किंचित जास्त ओमेगा-3 फॅटी अॅसिड असते, त्यामुळे हृदयासह इतर अनेक अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी ते फायदेशीर ठरते.

रोगप्रतिकारक शक्ती

जर तुम्हाला हिवाळ्यात संसर्ग किंवा इतर रोग टाळायचे असतील तर काळ्या तीळाचे अधिक सेवन करा. हे रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवते.

चयापचय

काळे तीळ खाल्ल्याने चयापचय क्रियाही नियमित होते. तसेच त्यात मॅग्नेशियम असल्यामुळे रक्तदाब सुधारतो. 

अपुऱ्या झोपेचा गर्भधारणेवर कसा होतो परिणाम? जाणून घ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा