अंकिता खाणे (Ankita Khane)
आजकाल सर्वचजण व्हॉट्सॲप हे सोशल मिडीया अॅप वापरतात.
सर्वाधिक वापरलं जाणारे हे इन्स्टंट मेसिजिंग ॲप याच्या अनेक फीचर्सबद्दल आपल्याला माहितही नसतं.
अनेकदा व्हॉट्सॲपवर एखादा युजर दुसऱ्या युजरला ब्लॉक करतो, म्हणजे संबधित युजर आता त्याला कोणताच मेसेज कॉल व्हॉट्सॲपद्वारे करु शकत नाही
आता आपण एखाद्याला ब्लॉक केलं हे त्याला लगेच कळत नाही.
तुम्हाला ब्लॉक केलं आहे, असा संशय आला तर तुम्हाला आधी त्याची ऑनलाइन स्थिती आणि लास्ट सीन चेक करावे लागेल.
हे दोन्ही तुम्हाला आधी दिसत असेल तर कदाचीत तुम्ही ब्लॉक झाले आहेत. पण त्याने तुम्हाला ब्लॉक केले आहे याची १००% गॅरंटी नाही, कदाचित त्याच्या प्रायव्हसी सेटिंगमध्ये लपवले असतील.
WhatsApp Tricksमेसेज सेंड झाल्यावर डबल टिक्स आणि ब्लू टिक्स दिसतच नसतील, तर समजा त्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केलले आहे.
पण तरीही कन्फर्म होत नसेल कारण समोरच्याने प्रायव्हसीमध्ये जाऊन डबल टिक किंवा ब्लू टिक hide केलेले असू शकते.
सेंड केलेला मेसेज जर पोहोचत नसेल किंवा समोरच्याला तुम्हीएकाध्या ग्रुपमध्ये अॅड करु शकत नसाल तर समजा तुम्हाला ब्लॉक केलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.