सकाळ डिजिटल टीम
हे लटकने हलके आणि नाजूक असतात. ते सध्या ड्रेसला देखील आकर्षित बनवत रोमँटिक टच देतो.
या प्रकारामध्ये लटकनला अशा छोट्या उशा असतात म्हणून याला पिलो पेंडल लटकन असे म्हणतात. यात विविध पॅटर्न आणि नाजूक भरतकाम केलेले फॅन्सी डिझाईन मिळतात. अशा प्रकारची लटकने हि ब्लाउज ला लावली जातात. जर ब्लाउज बॅकलेस असेल तर लटकन लावल्याने तो अधिक सुंदर दिसते.
पांढरेशुभ्र किंवा रंगीत मोती वर्क डिझाइन असणारे लटकन खूप सुंदर दिसतात. जर आपल्या ड्रेस वर किंवा ब्लाउजवर मोती वर्कचे डिझाईन असेल तर आपण त्याला हि मोती वर्क लटकन मॅच करू शकतो. फॅन्सी बँक ब्लॉउज सोबत देखील या पॅटर्नची लटकन खूप सुंदर आणि उठून दिसतात.
आपण असे बाजारांत विकत मिळणारे लटकने हि लोकरीपासून तयार केलेले मिरर वर्क किंवा गोंड्याचे डिझाईन असणारे लटकन देखील विकत घेऊ शकता.
जर आपल्याला हेव्ही किंवा कोणत्याही प्रकारचे डिझाईन वर्क नसणारे साधे लटकन हवे असतील तर, आपण असे कापडाचे लटकन विकत घेऊ शकता. कापडाचे लटकन हे आपण ब्लाउज आणि ड्रेस शिवून उरलेल्या कापडात देखील शिवून लावू शकता.
कस्टमाइज टेक्स्ट लटकन हे आपल्या स्वतःला वेगळे खास तयार करून घ्यावा लागतात. कारण या लटकन प्रकारामध्ये आपण आपल्या आवडीनुसार आपले नाव किंवा इतर कोणते हि लहान मेसेज लिहू शकतो. असे कस्टमाइज टेक्स्ट लटकन तयार करून देणारे अनेक जण बाजारात सहज मिळतील. अशा प्रकारचे लटकन थोड फार महाग असतात.
हे लटकन लहान टिकल्या लावून देखील अतिशय आकर्षक असे लटकन तयार केले जातात. जर ब्लाउसवर किंवा ड्रेसवर कुंदन वर्क असेल तर आपण असे कुंदन वर्कचे लटकन मॅच करू शकता.
येथे क्लिक करा....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.