धनश्री भावसार-बगाडे
पॅरिसपासून अमेरिका, इंग्लंड अन् भारताबरोबर जगभर हा ट्रेंड पसरत गेला. एका पिढीने हा ट्रेंड स्वीकारला आणि पुढच्या पिढ्यांकडे पसरवला.
अमेरिकेच्या विस्कोसिन स्टिव्हस् पॉईंट या विद्यापीठाने २००७ मध्ये मुलींना आवडणाऱ्या गुलाबी रंगाचे कारण शारीरिक आहे की, अजून काही यासाठी एक सर्वेक्षण केले
त्यात २०० मुलींना त्यांना गुलाबी रंग का आवडतो हे विचारलं होतं. त्यापैकी १५ टक्के मुलींचं म्हणणं होते की यामागे काहीतरी वैज्ञानिक कारण असू शकेल.
५५ टक्के मुलींनी इतरांच्या अंगावर हा रंग बघून स्वतः घालण्यास सुरुवात केली. तर इतर ४० टक्के मुलींना त्यांच्या गुलाबी रंग आवडण्याविषयी काहीही कारण देता आलेले नाही.
मार्केटिंगच्या मदतीने फॅशन इंडस्ट्रीने गुलाबी रंग हा केवळ युरोपियन देशांसाठी मर्यादित न ठेवता आशिया खंडात गुलाबी रंग मुलींचा आवडता' अशा जाहिराती केल्या आणि त्यावर शिक्कामोर्तब झालं. हेच निळ्या रंगासोबत झालं.
निळा रंग हा प्रामाणिकपणा आणि विश्वासार्हतेचं प्रतिक मानलं जातं. हेच कारण आहे की, कित्येक बँकांच्या नावात निळ्या रंगाची अक्षरं किंवा निळ्या रंगाचा वापर अधिक केलेला दिसतो.
पुरुषांच्या सुटस् च्या रंगात निळा रंगाचं प्रमाण हे त्यामुळेच अधिक बघायला मिळतं.
गुलाबी रंग हा मृदूता दर्शवतो, म्हणून तो रंग महिला अधिक प्रमाणात वापरतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.