Sudesh
आजकाल ब्लूटूथ स्पीकर ही गोष्ट अगदीच सामान्य झाली आहे. अमेझॉनचं एलेक्सा, गुगलचं नेस्ट अशा एआय स्पीकर्सची संख्याही वाढत चालली आहे.
कित्येक घरांमध्ये श्वान, मांजर किंवा अन्य प्राणी पाळलेले असतात.
मात्र तुमच्या घरातील ब्लूटूथ स्पीकर हे या पाळीव प्राण्यांसाठी धोकादायक ठरू शकतात, असं एका रिसर्चमध्ये समोर आलं आहे.
माणसांना 20Hz ते 20kHz पर्यंतच्या फ्रीक्वेन्सीचा आवाज ऐकू येतो. तर प्राणी 65kHz पर्यंत फ्रीक्वेन्सी ऐकू शकतात. श्वानांना 45kHz पर्यंत फ्रीक्वेन्सी ऐकू येतात.
म्हणजेच आपल्या घरातील पेट्स असे आवाजही ऐकू शकतात, जे आपण ऐकू शकत नाहीत.
ब्लूटूथ स्पीकरमधून तब्बल 23kHz एवढ्या फ्रीक्वेन्सीचा आवाज येत असतो. आपल्याला हा आवाज ऐकू येत नसल्यामुळे त्याचा धोका जाणवत नाही.
मात्र, प्राण्यांच्या कानावर सतत तो आवाज पडल्यामुळे त्यांना एन्झायटी, निद्रानाश असे आजार होऊ शकतात. तसंच कित्येक प्राण्यांना ऐकू येणंही बंद होऊ शकतं.