Sudesh
बीएमडब्ल्यू ही कार निर्माती कंपनी भारतात आपली नवी इलेक्ट्रिक लग्झरी सेडान कार लाँच करणार आहे.
BMW i5 M60 xDrive असं या कारचं नाव आहे. i5 या इलेक्ट्रिक सेडानचं हे टॉप व्हर्जन असेल.
BMW ने या कारसाठी बुकिंग सुरू केली आहे. ही कंपनीची दुसरी इलेक्ट्रिक सेडान कार आहे.
या कारची रेंज सिंगल चार्जमध्ये 516 किलोमीटर असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
ही कार 601hp पॉवर आणि 820Nm टॉर्क जनरेट करते. अवघ्या 3.8 सेकंदात ही कार 0 ते 100 kmph एवढा वेग पकडू शकते.
या कारमध्ये 12.3 इंच मोठा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळेल. सोबत यामध्ये 14.9 इंच मोठा सेंट्रल इन्फर्मेशन डिस्प्ले मिळतो.
या कारची डिलिव्हरी 2024 च्या मे महिन्यात सुरू होईल, असं कंपनीने म्हटलं आहे.
या कारची अधिकृत किंमत अद्याप समोर आलेली नाही. तज्ज्ञांच्या मते ही कार 95 लाख ते 1.05 कोटी रुपयांना उपलब्ध होईल.
कशी आहे श्याओमीची खास इलेक्ट्रिक कार?