तब्बल २१ वर्षांपासून बेपत्ता आहे बॉलिवूडमधील 'हा' अभिनेता

सकाळ डिजिटल टीम

तुम इतना जो मुस्कुरा रहे हो..क्या गम है जिस को छुपा रहे हो..‘ हे गाजलेलं गाणं ज्यांच्यावर चित्रित झालं आहे ते अभिनेते राज किरण गेली २१ वर्षं बेपत्ता आहे. अनिल कपूरशी तुलना केल्या गेलेल्या या अभिनेत्याने अचानक इंडस्ट्री सोडली. नेमकं काय घडलं त्यांच्याबरोबर जाणून घेऊया.

Raj Kiran

राज किरण यांचं पूर्ण नाव राज किरण महतानी असं आहे. त्यांनी ३० हुन अधिक बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केलं. 'अर्थ' सिनेमातील त्यांच्या भूमिकेचं विशेष कौतुक झालं. 'वारीस' हा त्यांचा बॉलिवूडमधील शेवटचा सिनेमा ठरला.

Raj Kiran

२००३ पासून राज किरण बेपत्ता असल्याचं म्हंटलं जातंय. कधी ते न्यूयॉर्कमध्ये टॅक्सी चालवतात, तर कधी ते दुसरी नोकरी करतात अशा अफवा आल्या होत्या. पण निश्चित माहिती समोर आली नाही.

Raj Kiran

त्यानंतर त्यांच्या मृत्यूची बातमीही समोर आली होती. तेव्हा अभिनेते ऋषी कपूर यांनी त्यांचा शोध घेण्याचा निर्णय घेतला.  2011 मध्ये ऋषी कपूर अमेरिकेला गेले होते. तेथे राज किरण याचे बंधू गोविंद मेहतानी यांची त्यांनी भेट घेतली. तेव्हा त्यांनी तो अटलांटामधील मनोरुग्णालयात असल्याचं सांगितलं.

Raj Kiran

ऋषी कपूर यांनी सांगितल्यानुसार, जेव्हा त्यांनी गोविंदजवळ राजचा नंबर मागितला, तेव्हा माझ्याजवळ त्याचा नंबर नाही, असे म्हणून गोविंद मेहतानीने ऋषी कपूर यांना टाळलं होतं. तर नंतर दीप्ती नवल यांनीही शोध घ्यावंच प्रयत्न केला पण त्यांतून काही निश्चित माहिती समजली नाही.

Raj Kiran

राज किरणच्या कुटुंबीयांनी ऋषी कपूर आणि दीप्ती नवलला त्यांच्या घरातील प्रकरणापासून दूर राहण्याची ताकीद दिली होती. कुटुंबीयांनी ऋषी कपूर यांचा दावा खोटा असल्याचे सांगत, राज अटलांटामध्ये नसून तो बेपत्ता असल्याचे सांगितलं. त्यानंतर ऋषी यांनी या प्रकरणावर भाष्य करणं टाळलं.

Raj Kiran

काही दाव्यानुसार, राज किरण यांनी चित्रपटांमध्ये काम करणे कमी केल्यानंतर राज किरणची आर्थिक परिस्थिती ढासळली होती. डिप्रेशनवर उपचार करताना त्यांचे पैसेही संपले. त्यानंतर त्यांची पत्नी आणि मुलांनी त्यांची साथ सोडली.

Raj Kiran
sai pallavi
साई पल्लवीचे सुपरहिट सिनेमे - येथे क्लिक करा