सकाळ डिजिटल टीम
बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौतचा चुलत भाऊ वरुण राणौतच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
वास्तविक, कंगना रनौतचा भाऊ वरुण राणौतचा विवाह अत्यंत साधेपणाने पारंपरिक पद्धतीने पार पडला, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतलेय.
कंगना रनौतने तिच्या ट्विटर अकाऊंटवर मेहंदी, हळदी आणि लग्नाचे काही फोटो पोस्ट केले आहेत, जे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
अभिनेत्री तिचा भाऊ वरुणच्या लग्नात लोकांमध्ये खूप आनंदी आणि एन्जॉय करताना दिसत आहे. कंगनाने या फोटोंमधून हिमाचलची परंपरा आणि संस्कृतीची ओळख करून दिलीये.
या फोटोमध्ये कंगना तिचा भाऊ वरुण आणि वहिनी सीमासोबत बसलेली दिसत आहे.
कंगना लग्नात तिची बहीण आणि कुटुंबातील अनेक सदस्यांसह एन्जॉय करत आहे. त्याचबरोबर एका लहान मुलाला आपल्या कडेवर धरून फोटो काढतानाही दिसत आहे.
कंगनाने हिरव्या आणि गुलाबी रंगाचा सूट परिधान केला आहे. या शिवाय, कानात झुमके, कपाळावर बिंदी, हिमाचली टोपी आणि मेकअपशिवाय तिनं आपला लूक पूर्ण केलाय.
कंगनाने काही दिवसांपूर्वी तिचा चुलत भाऊ वरुण आणि वहिनी सीमा यांना चंदीगडमध्ये करोडोंचे घर भेट म्हणून दिलं होतं.