सकाळ डिजिटल टीम
बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर सध्या सोशल मीडियापासून दूर असली, तरी ती दररोज तिच्या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.
आता अलीकडेच, एका कार्यक्रमाला जाताना पापाराझींनी अभिनेत्री सोनम कपूरला पाहिले आणि तिची जबरदस्त स्टाइल पाहून तिचे फोटो काढण्यास सुरुवात केली.
या फोटोंमध्ये अभिनेत्री किलर लूकमध्ये कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसत आहे.
सोनम कपूरने क्रीम रंगाचा फ्रॉक घातला आहे, त्याच्यावर अभिनेत्रीनं काळ्या रंगाचा ब्लेझर परिधान केला आहे.
या लूकमध्ये अभिनेत्री सोनम कपूर खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
अभिनेत्री सोनम कपूरने तिचे केस बांधून आणि हलका मेकअप करून तिचा लूक पूर्ण केला आहे.