SRK Birthday : बायकोसाठी पाच वर्षे हिंदू म्हणून राहिला होता King Khan!

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडच्या किंग खानचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घ्या.

शाहरुखचा जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीत झाला होता.

चित्रपटांच्या शूटिंगमधून वेळ मिळाला की शाहरुखला आपल्या फॅमिलीसोबत राहायला आवडतं.

त्याची लव्हस्टोरी सुद्धा एखाद्या चित्रपटाला लाजवेल अशीच आहे. गौरीसोबत लग्न करण्यासाठी त्याला असंख्य खटपटी कराव्या लागल्या होत्या.

१९८४ मध्ये एका पार्टीत शाहरुख आणि गौरी भेटले होते. या भेटीत शाहरुख १८ तर गौरी १४ वर्षांची होती.

शाहरुखला तिच्यासोबत डान्स करायचा होता, पण गौरीने त्याला नकार दिला.

नंतर गौरीने आपला बॉयफ्रेंड असल्याचं सांगितलं, पण तिचा कोणीही बॉयफ्रेंड नव्हता.

त्यानंतर हे दोघे जवळ आले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण हे एवढं सोपं नव्हतं. शाहरुख मुस्लीम तर गौरी हिंदू ब्राह्मण परिवारातून होती.

जेव्हा शाहरुख पहिल्यांदा गौरीच्या आई-वडिलांना भेटला होता, तेव्हा त्याने आपण हिंदू असल्याचं सांगितलं होतं.

एवढंच नाही तर शाहरुखने आपलं नावही वेगळं सांगितलं होतं. त्यानंतर अखेर गौरीचे आई-वडील लग्नाला तयार झाले.

२५ ऑक्टोबर १९९१ मध्ये दोघांनीही लग्न केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shahrukh Khan | Sakal