Sudesh
इलॉन मस्कने ट्विटरचं नाव आणि लोगो बदलल्याचं जाहीर केलं आहे. ट्विटरचं नाव आता 'एक्स' झालं आहे. मात्र, यापूर्वीही कित्येक मोठ्या कंपन्यांनी आपली नावं बदलली आहेत.
प्रसिद्ध ई-कॉमर्स वेबसाईट असणाऱ्या अमेझॉनचं आधीचं नाव Cadabra असं होतं. मात्र नंतर ते बदलून Amazon ठेवण्यात आलं.
आणखी एका प्रसिद्ध ई-कॉमर्स वेबसाईटचं पहिलं नावही वेगळंच होतं. तुम्ही आता ज्याला Ebay म्हणून ओळखता, त्या वेबसाईटचं आधीचं नाव Auction Web असं होतं.
फेसबुकचं आधीचं नाव Meta असं होतं. मात्र नंतर ते बदलून फेसबुक करण्यात आलं. पुढे फेसबुक-इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअपच्या पॅरंट कंपनीचं नाव पुन्हा मेटा ठेवण्यात आलं.
प्रसिद्ध सर्च इंजिन असणाऱ्या गुगलचं आधीचं नाव BackRub असं होतं. नंतर ते बदलून Google ठेवण्यात आलं.
प्रसिद्ध सोशल नेटवर्किंग साईट असणाऱ्या इन्स्टाग्रामचं नाव आधी Burbn असं होतं. नंतर ते Instagram करण्यात आलं.
नेटफ्लिक्स ही आधी डीव्हीडी रेंटल सर्व्हिस होती. याचं नाव तेव्हा Kibble असं होतं. नंतर ते बदलून Netflix करण्यात आलं.
कोल्ड्रिंकचा प्रसिद्ध ब्रँड असणाऱ्या पेप्सीचं आधीचं नाव Brad's Drink असं होतं. नंतर ते बदलून Pepsi करण्यात आलं.
जगप्रसिद्ध कॉफी शॉप फ्रँचायजी असणाऱ्या स्टारबक्सचं नाव पूर्वी Cargo House असं होतं. नंतर ते बदलून स्टारबक्स करण्यात आलं.
डेटिंगसाठी प्रसिद्ध असणाऱ्या या अॅपचं नाव आधी Matchbox असं होतं. यामुळेच त्याच्या लोगोवर तुम्हाला आग दिसेल. पुढे याचं नाव बदलून Tinder करण्यात आलं.
स्पोर्ट्स अॅक्सेसरीज बनवणारी प्रसिद्ध कंपनी नाईकचं जुनं नाव Blue Ribbon Sports असं होतं. पुढं ते बदलून Nike करण्यात आलं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.