पुजा बोनकिले
दरवर्षी १ ते ७ ऑगस्ट हा जागतिक स्तनपान आठवडा म्हणून साजरा केला जातो.
स्तनपान हे मुलांसाठी फायदेशीर असून आईच्या शारिरिक आणि मानसिक आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे.
आईचे दूध बाळांसाठी टॉनिकच मानले जाते.
यामुळे मुलांचा योग्य विकास होतो.
स्तनपान केल्याने बाळाची लवकर वाढ होते.
स्तनपानामुळे आई आणि बाळामधील भावनिक संबंध वाढण्यास मदत मिळते. तसेच दोघांचे नातं अधिक घट्ट होते.
स्तनपानानंतर वजन नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते.
दूध उत्पानासाठी स्तनपानासाठी अतिरिक्त ऊर्जा आणि कॅलरीज गरजेचे असते.