Pranali Kodre
क्रिकेटमध्ये सर्वोत्तम फलंदाजांची जेव्हाही चर्चा होते, तेव्हा भारताचा मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि वेस्ट इंडिजचा दिग्गज ब्रायन लारा यांचे नाव हमखास येते.
सचिन आणि लारा यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट आपल्या बॅटमधून मोठमोठ्या धावा करून गाजवलं आहे.
सचिन आणि लारा हे चांगले मित्रही आहेत. दरम्यान असं असलं तरी लाराच्यामते असा एक क्रिकेटर होता, जो त्यांच्यापेक्षाही चांगला होता.
लाराने त्याच्या 'लारा:द इंग्लंड क्रोनिकल्स'या पुस्तकात लिहिले आहे की वेस्ट इंडिज दिग्गज अष्टपैलू कार्ल हुपर हे त्याच्या आणि सचिनपेक्षाही महान खेळाडू बनू शकले असते.
लाराच्या म्हणण्यांनुसार जर कार्ल हुपर यांनी त्यांच्या क्षमतेचा पूर्ण वापर केला असता, तर ते सचिनपेक्षाही चांगले फलंदाज झाले असते.
लारा यांनी असंही म्हटलं की हुपर यांनी फक्त कर्णधार असतानाच चांगली कामगिरी केली, हे दु:खद आहे.
हुपर यांनी 102 कसोटीत 5762 धावा केल्या आणि 114 विकेट्स घेतल्या, तसेच 227 वनडेत 5761 धावा केल्या आणि 193 विकेट्स घेतल्या.