Amit Ujagare (अमित उजागरे)
प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय यांना ब्रिटनचा प्रतिष्ठित 'पेन पिंटर अवॉर्ड' घोषित झाला आहे.
ब्रिटिश नाटककार हेरॉल्ड पिंटर यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो.
१० ऑक्टोबर रोजी ब्रिटिश लायब्ररीच्यावतीनं आयोजित एका कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
पेन पिंटर अवॉर्ड हा दरवर्षी आपल्या जीवाची पर्वा न करता अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांना दिला जातो.
ब्रिटिन मानवाधिकार कार्यकर्ते आणि लेखकांची संस्था इंग्लिश पेनच्यावतीनं हा पुरस्कार दिला जातो.
२००९ मध्ये या पुरस्काराची सुरुवात झाली. ज्यांच्या नावे हा पुरस्कार दिला जातो ते हेरॉल्ड पिंटर हे नोबेल विजेते नाटककार, स्क्रीन रायटर, दिग्दर्शक आणि अभिनेते होते.
अरुधंती रॉय यांना यापूर्वी १९९७ मध्ये 'द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज' या कादंबरीसाठी 'बुकर प्राईज' हा पुरस्कारही मिळाला आहे.
अरुंधती रॉय या सातत्यानं मानवाधिकारांचं हनन होणाऱ्या मुद्द्यांवर कठोर शब्दांत व्यक्त होतात, लिहितात. त्यांच्यावर १४ वर्षे जुन्या खटल्यात नुकताच युएपीए दाखल करण्यात आला आहे.