कार्तिक पुजारी
ब्लॅक डेथ म्हणून कुख्यात असलेल्या आजारामागील बुबोनिक प्लेगची एका व्यक्तीला लागण झाल्याने खळबळ उडाली आहे.
अमेरिकेच्या ओरेगॉन शहरात या महामारीचा रुग्ण आढळून आल्याने यंत्रणा सतर्क झाली आहे.
पाळीव मांजराच्या संपर्कात आल्याने व्यक्तीला या विषाणूची लागण झाली.
प्लेग हा झूटॉनिक बॅक्टेरियल इंफेक्शन आहे जो बेक्टेरियम येयेरसिन्हा पेस्टिसमुळे होतो. या विषाणू माणूस आणि प्राण्यांमध्ये संक्रमित होऊ शकतो.
सर्वसाधारणपणे उंदिर, मांजरामध्ये हा विषाणू राहतो.
ब्लॅक डेथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुबोनिक प्लेग महामारीमध्ये १३४६ आणि १३५३ मध्ये एकट्या युरोपमध्ये ५ कोटी नागरिकांना मृत्यू झाला होता.
संसर्गित प्राण्यांवर जगणारे उंदिर बेक्टेरियम येयेरसिन्हा पेस्टिसचे विषाणूचे वहन करतात. व्यक्तीला उंदिराने चावल्यामुळे याचा प्रसार होतो.
संसर्गित प्राण्याच्या संपर्कात आल्याने देखील याचा प्रचार होतो. दुर्मिळ प्रकरणात संसर्गित व्यक्ती किंवा प्राण्याच्या सानिध्यात श्वास घेतल्याने याचा संसर्ग होतो.