Sudesh
गेल्या काही महिन्यांमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, म्हणजेच एआयने मोठ्या प्रमाणात प्रगती केली आहे. आजकाल सर्वांच्या तोंडी केवळ एआयचीच चर्चा आहे.
एआयमुळे आयटी सेक्टरमधील कित्येक लोकांच्या नोकऱ्या गेल्या, तर आणखी कित्येक सेक्टरमधील नोकऱ्या धोक्यात आल्या असल्याचं म्हटलं जातं.
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हे लोकांकडून डेटा गोळा करून स्वतःचं ज्ञान वाढवत आहे. त्यामुळेच भविष्यात हे आणखी प्रगत आणि हुशार होऊ शकतं.
सध्याच्या एआयचं पुढचं रुप म्हणून 'सुपर इंटेलिजेंट एआय'कडे पाहिलं जात आहे. मात्र, हे मानवापेक्षा अधिक हुशार किंवा पॉवरफुल असेल का?
सुपर इंटेलिजेंट एआय हे कोणत्याही क्षेत्रात मानवापेक्षा सरस असेल, असं मत ऑस्कफोर्ड विद्यापीठातील प्राध्यापक निक बोस्ट्रोम यांनी व्यक्त केल आहे.
मायक्रोसॉफ्ट कंपनीचे अध्यक्ष ब्रॅड स्मिथ यांनी मात्र याउलट मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले, की सुपर इंटेलिजेंट एआय हे मानवापेक्षा हुशार नसेल.
ब्रॅड म्हणाले, की अशा प्रकारचं तंत्रज्ञान विकसित होण्यासाठी किमान 10 वर्षांचा काळ लागू शकतो. सध्या एआयला अधिक प्रगत बनवण्याऐवजी आम्ही त्याला सुरक्षित बनवण्यावर भर देत असल्याचं त्यांनी सांगितलं.
सुपर इंटेलिजेंट एआय हे आपल्या कामी येण्याची शक्यता तेव्हाच आहे, जेव्हा त्याला लोकांची आणि काळाची गरज लक्षात घेऊन ट्रेन करण्यात येईल, असं निक म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.