Sudesh
गेल्या काही वर्षांत, विविध प्रकारच्या कर्करोगाच्या प्रादुर्भावात लक्षणीय वाढ झाली आहे. ही वाढ अशीच कायम राहण्याची शक्यता आहे.
कर्करोगाच्या अनेक कारणांपैकी सर्वात दुर्लक्षित केलेलं कारण म्हणजे मानसिक तणाव.
तणाव हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. कामाचा ताण, सहकाऱ्यांच्या अपेक्षा आणि टार्गेट पूर्ण करण्यासाठीचा ताण यांसारख्या कारणांमुळे तो निर्माण होतो.
या ताणामुळे शरीरामध्ये हॉर्मोनल असंतुलन निर्माण होतं. पर्यायाने लोक जलदगतीने काम करणारे स्ट्रेस-बस्टर्स शोधू लागतात.
यामध्ये मग फास्ट फूड, जंक फूड, मद्यपान, धूम्रपान किंवा तंबाखू सेवन अशा प्रकारच्या गोष्टींचं सेवन करण्याचा पर्याय लोक अवलंबतात.
या सर्व पदार्थांच्या सेवनामुळे कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. कर्करोगासाठी या पदार्थांना ब्लेम करताना, तणावाकडे बऱ्याच वेळा दुर्लक्ष केलं जातं.
कॅन्सर आणि इतर आजारांचा धोका कमी करण्यासाठी मानसिक आरोग्यावर अधिक भर देणे आवश्यक आहे. मानसिक आरोग्य हे संपूर्ण आरोग्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते आणि ताण पातळी कमी करणे अत्यंत आवश्यक आहे.
ताणपूर्ण मनस्थिती उपचारांवरही नकारात्मक परिणाम करू शकते. म्हणूनच, साईक-ऑनकॉलॉजिस्ट तज्ज्ञ किंवा आरोग्य सेवा व्यावसायिकांकडून मदत घेणे आवश्यक आहे.