सकाळ डिजिटल टीम
यंदाचा कान फिल्म फेस्टिव्हल गाजवला तो भारतीय फॅशन इन्फ्लुएन्सर नॅन्सी त्यागीने.
नॅन्सीने स्वतः डिझाईन केलेला पिंक रंगाचा लॉँग गाऊनने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. हा गाऊन तिने स्वतः डिझाईन केला होता.
फक्त सामान्य लोकांनीच नाही तर बॉलिवूड सेलिब्रिटीजनाही नॅन्सीच्या पोषाखाची भुरळ पडली आणि सोशल मीडियावर तिच्या या आऊटफिटचं सगळ्यांनी भरभरुन कौतुक केलं.
अभिनेत्री सोनम कपूरलाही नॅन्सीच्या आऊटफिटची भुरळ पडली आणि तिने नॅन्सीचं कौतुक करत "माझ्यासाठीही आऊटफिट डिझाईन कर" अशी मागणी केली.
नॅन्सीने नुकतीच रणवीर अलाहबादीयाच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. तेव्हा त्याने तिला सोनमच्या मागणीबद्दल विचारलं. तेव्हा ती म्हणाली कि,"साठी जन्मात मी कधी असा विचार केला नव्हता कि सोनम कपूर माझ्याकडून आऊटफिट डिझाईन करून घेईल. "
नॅन्सी सोनमसाठी साडी डिझाईन करणार असून लवकरच तिला ती गिफ्ट करेल असं तिने म्हंटलं.
फक्त सोनमचं नाही तर नॅन्सीला किंग खानसाठी आऊटफिट डिझाईन करायचा आहे.
नॅन्सी एका गरीब कुटूंबातून असून तिच्या आईला फॅक्टरीत काम करावं लागू नये म्हणून नॅन्सीने आऊटफिट डिझाईन करायला सुरुवात केली आणि आता ती सोशल मीडियाची स्टार बनलीय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.