Captain Brijesh Thapa: आईने अश्रूपूर्ण डोळ्यांनी सांगितली 26 वर्षीय वीर योद्ध्याची कहाणी

Sandip Kapde

सैन्याचे चार जवान शहीद

जम्मू-कश्मीरच्या डोडा जिल्ह्यात शनिवार रात्री घनदाट जंगलांमध्ये अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज असलेल्या आतंकवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सैन्याचे चार जवान शहीद झाले.

Captain Brijesh Thapa: | esakal

जम्मू-कश्मीर पोलीस

यात कॅप्टन बृजेश थापा, नायक डी. राजेश, सिपाही बिजेंद्र आणि अजय यांचा समावेश होता. जम्मू-कश्मीर पोलीस स्पेशल ऑपरेशन ग्रुपचा एक जवानही या चकमकीत वीरगतीला प्राप्त झाला.

Captain Brijesh Thapa: | esakal

दार्जिलिंग

कॅप्टन बृजेश थापा दार्जिलिंगच्या बडा गिंग बाजार येथील रहिवासी होते. त्यांच्या तीन पिढ्या सैन्यात सेवा बजावत होत्या.

Captain Brijesh Thapa: | esakal

बृजेशचे वडील

बृजेशचे वडील कर्नल भुवनेश कुमार थापा सैन्यातून निवृत्त झाले आहेत. बृजेश 2019 मध्ये आर्मीमध्ये कमीशंड झाले होते आणि त्यांची निवड 10 राष्ट्रीय राइफल्समध्ये झाली होती.

Captain Brijesh Thapa: | esakal

शूरवीर सैन्य

या शूरवीर सैन्य अधिकाऱ्याच्या शहीद होण्याच्या बातमीनंतर दार्जिलिंगमध्ये शोककळा पसरली.

Captain Brijesh Thapa: | esakal

कॅप्टन बृजेश थापा

कॅप्टन बृजेश थापांच्या आई, निलिमा थापा, यांनी आपल्या मुलाच्या आठवणी सांगताना म्हणाल्या, "15 जानेवारीला माझ्या मुलाचा वाढदिवस होता आणि त्याच दिवशी आर्मी डे असतो. माझा मुलगा आर्मीच्या कर्तव्यावर असताना देशासाठी समर्पित झाला.

Captain Brijesh Thapa: | esakal

आर्मी

"सैन्यात असण्याचा त्याला अभिमान होता. त्याच्या वडिलांनी नेव्हीमध्ये जाण्याचा सल्ला दिला होता, पण त्याला आर्मीमध्येच जायचे होते."

Captain Brijesh Thapa: | esakal

बृजेश थापा

बृजेशच्या शेवटच्या भेटीच्या आठवणींमध्ये निलिमा थापा म्हणाल्या, "बृजेश मार्चमध्ये घरी आला होता. आता तो पुन्हा घरी येणार होता. तो नेहमी आनंदी असायचा.

Captain Brijesh Thapa: | esakal

आतंकवाद रोखण्याचा प्रयत्न

"रविवारला शेवटची भेट झाली होती. सरकार नेहमी आतंकवाद रोखण्याचा प्रयत्न करते, पण जवान कधीच घाबरत नाहीत. माझा मुलगा 26 वर्षांचा होता आणि देशासाठी काहीतरी करायचे त्याला नेहमीच वाटायचे."

Captain Brijesh Thapa: | esakal

कर्नल भुवनेश थापा

कर्नल भुवनेश थापा यांनी सांगितले, "शेवटच्या वेळेस रात्री 9:30 वाजता बोललो होतो. त्याने म्हटले होते की, आज रात्री 7 तासाची चढाई करायची आहे.

Captain Brijesh Thapa: | esakal

आर्मी

त्याने बीटेक केले होते आणि मी त्याला दुसरीकडे नोकरी करायला सांगितली होती, पण त्याला आर्मीमध्येच जायचे होते."

Captain Brijesh Thapa: | esakal

आद्य शंकराचार्य नेमकं कोण होते?

shankaracharya
येथे क्लिक करा