सकाळ डिजिटल टीम
यूपीएससीची तयारी करणाऱ्या किंवा तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थांसाठी नागरी सेवा वगळता देखील करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. चला तर मग जाणून घेऊयात.
सरकारी संस्था अनेकदा आरोग्य आणि पायाभूत सुविधांसारख्या क्षेत्रांमध्ये मार्गदर्शन सल्लागारांची नियुक्ती करतात, यूपीएससी विद्यार्थी आपल्या कौशल्यांचा वापर करून या क्षेत्रात करिअर करू शकतात.
यूपीएससी विद्यार्थी त्यांच्या सखोल विषयाचे ज्ञान आणि विश्लेषणात्मक कौशल्ये वापरून संशोधक संस्थांमध्ये संशोधन किंवा कोचिंग सेंटरमध्ये शिकवू शकतात.
अर्थशास्त्र आणि व्यवस्थापन कौशल्यांचा वापर करून यूपीएससी विद्यार्थी या क्षेत्रात करिअर करू शकतात.
यूपीएससी विद्यार्थांना आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये धोरणात्मक संशोधन किंवा सामाजिक आणि शासकीय समस्यांच्या उपाय-योजनांवर काम करण्याची संधी असते.
चालू घडामोडी आणि सार्वजनिक धोरणांची समज असणाऱ्या विद्यार्थांना पत्रकारिता, मीडिया किंवा संपादकीय भूमिकांमध्ये काम करण्याची संधी असते.
यूपीएससी तयारीद्वारे प्राप्त केलेली शिस्त आणि समस्या सोडवण्याची मानसिकता विद्यार्थांना उद्योजकतेसाठी योग्य बनवते.
यूपीएससी तयारी दरम्यान मिळालेली विश्लेषणात्मक कौशल्ये, नेतृत्व, निर्णयक्षमता, व्यवस्थापन अशा मौल्यवान कौशल्यांमुळे विद्यार्थांना कॉर्पोरेट क्षेत्रात करिअर करण्याची संधी निर्माण होते.