विम्बल्डन २०२४ मध्ये अल्का'राज'! दिग्गजांच्या मांदियाळीत मिळवलं स्थान

Pranali Kodre

विम्बल्डन २०२४

विम्बल्डन २०२४ स्पर्धेच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद २१ वर्षीय कार्लोस अल्काराजने मिळवले. त्याने अंतिम सामन्यात नोव्हाक जोकोविचला ६-२, ६-२, ७-६ (७-४) अशा सरळ तीन सेटमध्ये पराभूत केले.

Carlos Alcaraz | Wimbledon | X/Wimbledon

चौथं ग्रँडस्लॅम

अल्काराजचे हे एकूण चौथे ग्रँडस्लॅम, तर दुसरे विम्बल्डन विजेतेपद आहे.अल्काराजने यापूर्वी अमेरिका ओपन २०२२ आणि फ्रेंच ओपन २०२४ या ग्रँडस्लॅम स्पर्धांचेही विजेतेपद जिंकले आहे.

Carlos Alcaraz | Wimbledon | X/atptour

दिग्गजांमध्ये सामील

त्यामुळे तो साल १९६८ नंतर एकाच वर्षात फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन जिंकणारा तो रॉड लेव्हर, ब्योर्न बॉर्ग, राफेल नदाल, रॉजर फेडरर आणि नोवाक जोकोविच यांच्यानंतरचा सहावा खेळा़डू ठरला आहे.

Carlos Alcaraz | Wimbledon | X/Wimbledon

दुसरा टेनिसपटू

अल्काराजने आत्तापर्यंत चार ग्रँडस्लॅमचे अंतिम सामने खेळले असून चारही वेळा विजेतेपद जिंकले आहे. ओपन एरामध्ये असा पराक्रम करणारा रॉजर फेडररनंतरचा तो दुसराच पुरुष टेनिसपटू आहे. फेडररने पहिले सात ग्रँडस्लॅम अंतिम सामने जिंकले होते.

Carlos Alcaraz | Wimbledon | X/Wimbledon

स्पेनचा पहिलाच खेळाडू

अल्काराज सलग दोन विम्बल्डन जिंकणारा स्पेनचा पहिलाच खेळाडू आहे.

Carlos Alcaraz | Wimbledon | X/atptour

बीग थ्रीच्या यादीत सामील

तसेच २१ व्या शतकात फेडरर, नदाल आणि जोकोविच यांच्याव्यतिरिक्त पुरुष एकेरीत चार ग्रँडस्लॅम जिंकणारा एकमेव खेळाडू आहे.

Carlos Alcaraz | Wimbledon | X/atptour

जोकोविचला सरळ सेटमध्ये हरवणारा...

अल्काराज ग्रँडस्लॅमच्या अंतिम सामन्यात जोकोविचला सरळ तीन सेटमध्ये पराभूत करणारा पाचवाच खेळाडू आहे. यापूर्वी फेडरर (२००७ अमेरिकन ओपन), अँडी मरे (विम्बल्डन २०१३), नदाल (फ्रेंच ओपन २०२०), डॅनिल मेदवेदेव (अमेरिकन ओपन २०२१) यांनी असा पराक्रम केलाय.

Carlos Alcaraz | Wimbledon | X/Wimbledon

बीग थ्रीला मागं टाकलंय

बिग थ्री म्हणजेच फेडरर (२३ वर्षे), नदाल (२२ वर्षे) आणि जोकोविच (२४ वर्षे) यांच्यापेक्षा कमी वयात अल्काराजने ४ ग्रँडस्लॅम जिंकले आहे.

Carlos Alcaraz | Wimbledon | X/Wimbledon

कमी सामने

तसेच बिग थ्री पेक्षा कमी सामने खेळतही अल्काराजने चार ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. चौथे ग्रँडस्लॅम जिंकण्यासाठी फेडररने ७९, नदालने ८१ आणि जोकोविचने १३४ सामने खेळले होते.

Carlos Alcaraz | Wimbledon | X/Wimbledon

सुटाबुटातील हिटमॅन! विंबल्डन पाहायला पोहचला वर्ल्डकप चॅम्पियन कर्णधार..

Rohit Sharma at Wimbledon (1).jpg | Sakal
येथे क्लिक करा