Indian Wells जिंकत अल्कारेजने केली नदालच्या विक्रमाची बरोबरी

सकाळ डिजिटल टीम

कार्लोस अल्कारेज विजेता

इंडियन वेल्स ओपन 2024 टेनिस स्पर्धेत 17 मार्च रोजी पुरुष एकेरीचे विजेतेपद 20 वर्षीय कार्लोस अल्कारेजने जिंकले.

Carlos Alcaraz | Indian Wells Tennis Tournament | X/BNPPARIBASOPEN

सलग दुसरे विजेतेपद

अल्कारेजने सलग दुसऱ्यांदा इंडियन वेल्स स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे.

Carlos Alcaraz | Indian Wells Tennis Tournament | X/BNPPARIBASOPEN

मेदवेदेवचा पराभव

इंडियन वेल्स ओपन 2024 च्या अंतिम सामन्यात अल्कारेजने चौथ्या मानांकित डॅनिल मेदवेदेवला 7-6(5), 6-1 अशा फरकाने सरळ दोन सेटमध्ये पराभूत केले.

Carlos Alcaraz | Indian Wells Tennis Tournament | X/BNPPARIBASOPEN

विम्बल्डन 2023 नंतरचे पहिलेच विजेतेपद

अल्कारेजचे हे विम्बल्डन 2023 नंतरचे पहिलेच विजेतेपद आहे.

Carlos Alcaraz | Indian Wells Tennis Tournament | X/BNPPARIBASOPEN

इंडियन वेल्स ओपन 2023

विशेष म्हणजे इंडियन वेल्स ओपन 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही अल्कारेजने मेदवेदेवलाच पराभूत करत विजेतेपद जिंकले होते.

Carlos Alcaraz | Indian Wells Tennis Tournament | X/BNPPARIBASOPEN

पाचवे मास्टर्स 1000 विजेतेपद

अल्कारेजचे हे पाचवे एटीपी मास्टर्स 1000 विजेतेपदही ठरले आहे.

Carlos Alcaraz | Indian Wells Tennis Tournament | X/BNPPARIBASOPEN

नदालची बरोबरी

त्यामुळे वयाची 21 वर्षे पूर्ण करण्यापूर्वी 5 किंवा त्यापेक्षा अधिक एटीपी मास्टर्स 1000 विजेतेपद जिंकणारा राफेल नदालनंतरचा दुसराच खेळाडू आहे.

Carlos Alcaraz | Indian Wells Tennis Tournament | X/BNPPARIBASOPEN

RCB चे पहिल्या-वहिल्या विजेतेपदानंतर जोरदार सेलिब्रेशन, पाहा Photos

RCB | WPL 2024 | X/RCBTweets
येथे क्लिक करा