अनिरुद्ध संकपाळ
क्ले, हार्ड आणि ग्रास कोर्टवर खेळत ग्रँड स्लॅम जिंकणारा कार्लोस अलकराझ हा सर्वात युवा टेनिसपटू ठरला आहे. त्याने आपले तिसरे ग्रँड स्लम जिंकले.
या विजयानंतर कार्लोसची तुलना राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोविचसोबत होऊ लागली आहे.
राफेल नदालने सर्वाधिक 14 फ्रेंच ओपन जिंकण्याचा विक्रम केला आहे. तर जोकोविचने 24 ग्रँड स्लॅम जिंकण्याचा विश्वविक्रम केलाय.
या दोघांचे रेकॉर्ड कार्लोस मागे टाकणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यावर 21 वर्षाचा कार्लोसने जबरदस्त उत्तर दिलं.
तो म्हणाला हे सर्व विक्रम मोडण्यासाठी तुम्हाला एलियन असलण्याची गरज आहे. राफाचे 14 फ्रेंच ओपन अशक्य. 24 ग्रँड स्लॅम मी जिंकू शकतो मात्र ते जवळपास अशक्यच आहे.
या दोन्ही गोष्टी मिळवणं सधी सोपी गोष्ट नाही. फ्रेंच ओपनच्या फायनलपूर्वी माझ्या कोचने मला सांगितलं की तुला तिसऱ्या ग्रँडस्लॅमसाठी खूप संघर्ष करावा लागणार आहे.
या सर्वातून जाताना मला माहिती आहे की एक ग्रँड स्लॅम जिंकणे किती कठिण आहे. जोकोविचनं 24 जिंकले आहेत. त्यामुळे ते अशक्यच आहे. सध्या मी याचा विचार करत नाहीये.