Afghanistan Celebration : सेमी फायनलमध्ये पोहचताच अफगाणिस्तानच्या रस्त्यावर उसळला जनसागर

अनिरुद्ध संकपाळ

अफगाणिस्तानने टी 20 क्रिकेट मध्ये इतिहास रचला. टी 20 वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच त्यांनी सेमी फायनलपर्यंत मजल मारली.

अफगाणिस्तानने सुपर 8 मधील आपल्या शेवटच्या सामन्यात बांगलादेशचा 8 धावांनी पराभव केला.

अफगाणिस्तानच्या या ऐतिहासिक विजयानंतर अफगाणिस्तानच्या रस्त्यावर जनसागर उसळला.

आस्ट्रेलियाविरूद्धचा सामना जिंकल्यानंतर देखील अफगाणिस्तानमध्ये जल्लोष झाला होता.

लोकांनी रस्त्यावर उतरून आपल्या संघाचं ये ऐतिहासिक यश साजरं केलं.

अफगाणिस्तानचा आता पुढचा सामना हा दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 27 जूनला होणार आहे.